पंपिंगस्टेशन ठरले तारणहार! पाच केंद्रांवर २८ पंप २४ तास `इन अॅक्शन’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी पालिकेने सुरू केलेल्या पाच पंपिंग स्टेशनवर २८ पंप २४ तास कार्यरत ठेवल्यामुळे  पाण्याचा निचरा वेगाने होण्यास मदत झाली. या पंपांमधून तब्बल ८ आणि ९ जुलै अशा दोन दिवसांत तब्बल ७८२.४ कोटी लिटरपेक्षा अधिक पाण्याचा निचरा या पंपिंग स्टेशनमधून करण्यात आला. शिवाय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेली नालेसफाई आणि तरंगणारा कचरा अडवण्यासाठी ‘ट्रॅश ब्रूम’ वापरल्यामुळे पंप बंद पडण्याचे प्रमाण शून्यावर आले.

प्रतिसेकंद २ लाख २२ हजार लिटर पाण्याचा निचरा
या प्रत्येक पंपाची क्षमता प्रतिसेकंद सहा हजार लिटर पाण्याचा निचरा करण्याची आहे. त्यामुळे सर्व पंपिंग स्टेशनची आकडेवारी लक्षात घेता प्रतिसेवंâद २ लाख २२ हजार लिटर पाण्याचा निचरा होतो अशी माहिती पर्जन्य जलवाहिन्या खात्याचे प्रमुख अभियंता कावळे यांनी दिली. दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पाश्र्वभूमीवर पालिका आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी आज लव्हग्रोव्ह पंपिंग स्टेशनला भेट देऊन कामाचा आढावाही घेतला.