आमदार विश्वजीत कदम यांच्या मोटारीला अपघात

540

पक्ष संघटनेची बैठक आटोपून मुंबईहून पुण्यात परतताना मोटार झाडाला धडकल्याने काँग्रेसचे कार्याध्यक्ष व आमदार विश्वजीत कदम किरकोळ जखमी झाले. मोटारीतील एअर बॅग्स उघडल्याने मोठा अनर्थ टळला असून सुखरूप असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ही घटना काल मध्यरात्री घडली.

सांगली जिह्यातील पलूस-कडेगाव मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार कदम काल सकाळी काँग्रेस पक्ष संघटनेच्या मुंबईतील बैठकीला गेले होते. बैठकीनंतर रात्री उशिरा ते चालकासह मोटारीतून पुण्यात परत येत होते. त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची मोटार झाडाला धडकल्यामुळे अपघात झाला. त्यामध्ये कदम यांच्या खांद्याला किरकोळ जखम झाली. ही माहिती स्वतः कदम यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या