पुण्यात कोरोना रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका उलटली

749

चतुःश्रुंगी परिसरात क्वारटाईन करण्यात आलेल्या कोरोना रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला बावधन परिसरात अपघात झाला आहे. हा अपघात इतका भयानक होता की रुग्णवाहिका काही अंतर फरफटत गेली होती. मात्र सुदैवाने यात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. यात एका छोट्या मुलाचा समावेश होता.

किष्किंदानगर परिसरात कोरोना लक्षण असणाऱ्या व्यक्तींना शाळेत क्वारटाईन करण्यात आले आहे. त्यांची तपासणी करण्यात येत आहे. कोरोनाची लागण झालेल्यांना बालेवाडी परिसरात नेण्यात येत असून त्याठिकाणी उपचार केले जात आहे. दरम्यान आज महापालिकेची रुग्णवाहिक काही जणांना घेऊन बालवाडीत येथे जात होती. त्यावेळी बावधन परिसरात शिवप्रसाद हॉटेलसमोर या रुग्णवाहिकेला भीषण अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. गाडी रस्त्यावर काही अंतर फरफटत गेल्यामुळे रुग्ण जखमी झाले. त्यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच दुसरी गाडी घेऊन व पीपीई किट घालून कर्मचारी बोलावले. त्यानंतर हे रुग्ण रुग्णवाहिकेत बालेवाडी येथे पाठविण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या