
पीककर्ज मंजूर करण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वाघोली शाखेचे विकास अधिकारी आणि बोल्हाई गावच्या सोसायटीचे सचिवाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. दीपक रामचंद्र सायकर वय 38 पद विकास अधिकारी आणि गोपीनाथ दत्तात्रय इंगळे वय 27 पद सोसायटी सचिव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वाडेबोल्हाई गावातील तक्रारदार शेतकऱ्याला पीककर्ज घ्यायचे होते. त्यासाठी त्याने अर्ज केल्यानंतर कर्ज मंजूर करण्यासाठी बँकेचे विकास अधिकारी आणि सोसायटीचे सचिव यांनी तक्रारदाराकडे पाच हजारांची लाच मागितली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना रंगेहात पकडले.






























































