
विद्युत रोहित्रातून (डिपी) तांब्याच्या तारा चोरणाऱ्यांना चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून त्यांचेकडून तांब्याचे 160 किलो वायईडींगसह एक मोटार असा ऐवज हस्तगत करण्यात आला. त्याशिवाय कंपनील बॅटऱ्या चोरणाऱ्यांनाही जेरबंद केले आहे. मोहमद फारुख रोशन चौधरी ( रा. वसई, मुळ उत्तरप्रदेश ) कृष्णबिहारी रामभरोसे यादव ( रा.कल्याण,मुळ- उत्तरप्रदेश) यांना अटक करण्यात आली.
तपास पथकातील अमंलदार प्रविण शिंदे व दत्ता गेंगजे हे मिटकॉन कॉलेज बालेवाडी भागात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी महावितरणच्या ट्रान्सफार्मरमधील तांब्याचे कॉईल चोरुन घेवून जाणाऱ्या मोहमद आणि कृष्णबिहारी यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी पोलादपूर, भोईसर आणि चतुःशृंगी पोलीस हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलीस अंमलदार दिनेश गडाकुंश आणि आशिष निमसे यांना मिळालेल्या माहितीनुसार किरण नागेश विटकर ( रा.सोमेश्वर मंदिराजवळ, जनता वसाहत जनवाडी पुणे) यास ताब्यात घेवून त्याचेकडून 1 लाख 10 हजार 780 रुपयांचे दोन एसी व दोन जुने मायक्रोव्हेव हस्तगत करण्यात आले आहेत.
पोलीस अमलदार प्रकाश आव्हाड यांना मिळालेल्या बातमीवरून टिकाराम दिगंबर नेमाडे ( रा. वाल्केकरवाडी पुणे, मुळ-जळगांव) याचा शोध घेवून त्याचेकडून एका गुन्हयातील 11 हजारच्या एचबीएल कंपनीच्या 11 बॅटऱ्या हस्तगत केल्या आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांच्या सुचनांप्रमाणे पोलीसउप निरीक्षक महेश भोसले, मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार मुकुंद तारू, ज्ञानेश्वर मुळे, श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन, प्रमोद शिंदे, संतोष जाधव, सुधीर माने, अमोल जगताप, तेजस चोपडे यांनी केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले करीत आहेत.
























































