Video – पुण्यात 1 कोटी 4 लाखांचे चरस जप्त, दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नववर्षांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पाट्र्यात विक्री करण्यात येणाऱ्या आंतरराज्य चरस विक्रेत्यांचे पुणे लोहमार्ग पोलिसांनी कंबरडे मोडले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, बँगलोर, गोव्यासह वेगवेगळया ठिकाणी चरसचे वितरण केले जाणार होते. हिमाचल प्रदेशातून रेल्वेतून पुण्यात चरसची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 3 लाख 64 हजार रुपये किंमतीचे 34 किलो 404 ग्रॅम चरस जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चररची विंâमत 120 कोंटीवर असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस अधिक्षक सदानंद वायसे-पाटील यांनी दिली आहे.

ललित कुमार दयानंद शर्मा (वय-49) आणि कौलसिंग रुपसिंग सिंग (40, दोघेही रा. कुलु, हिमाचल प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.

चरस विक्रीसाठी दोघेजण हिमाचल प्रदेश येथून पुण्यात येणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी चार पथके तयार करुन सलग सात दिवस दिल्लीकडून पुण्यात येणाऱ्या रेल्वेवर नजर ठेवत तपासणी केलली. त्यासाठी दरोडा पथकातील अधिकारी व 45 पोलीस अंमलदार यांचे पथक गस्त घालून होते. 19 डिसेंबरला रात्री पावणेअकरा वाजण्याचे सुमारास दोघे जण पुणे रेल्वे स्टेशनमध्ये उतरले. त्यानंतर त्यांनी दोन बॅग घेउन वाडीया ब्रिजच्या दिशेन पळ काढला. लोहमार्ग पोलिसांनी पाठलाग करून ललितकुमार आणि कौलसिंगला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन बॅगमधील 34 किलो चरस जप्त केला . पुणे लोहमार्ग पोलीसांनी दोघांविरूद्ध एनडीपीसी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयात हजर केले असता दोन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींकडून 34 किलो चरस पैकी 22 किलो चरस मुंबईला, पाच किलो चरस गोव्याला, पाच किलो चरस बँगलोरला, दोन किलो चरस पुण्यात वितरित करण्यात येणार होते. ही कामगिरी लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, पोलीस निरीक्षक मौला सय्यद, पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड, संतोष लाखे, माधव केंद्रे, अशोक गायकवाड, गंगाधर ईप्पर, गणेश शिंदे, श्रीकांत बोनाकृती, वैâलास जाधव यांच्या पथकाने केली.

चरसची सायलन्सर मधून तस्करी

ललित कुमार शर्मा याचा कुलु जिल्हयात ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून सफरचंदची शेती आहे. तर कौलसिंग सिंग हा चालक म्हणून काम करतो. मनाली पासून ४० किलोमीटर अंतरावर मनाला, रसेल, पुल,तोश, छलांग ही वेगवेगळी गावे असून त्याठिकाणी अनेक घरांमध्ये चरसची निर्मिती होत आहे. कसोल या तहसील ठिकाणी ते गोळा करुन ते वाहनांचे बनावट सायलन्सर तयार करुन त्यामध्ये भरुन दिल्ली पर्यंत आणले जाते.

कंगणा राणावतच्या घरापासून 12 किलोमीटरवर चरसची निर्मिती

बॉडीवूड अभिनेत्री कंगणा राणावत राहत असलेल्या हिमाचल प्रदेशमधील घरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर चरस तयार केले जात होते. अशी माहिती अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांना दिली आहे. त्यामुळे आरोपींकडून चरस प्रकरणी आणखी काही खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात लोहमार्ग अपर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई यांच्याकडे माहिती पाठविण्यात आल्याचे वायसे पाटील यांनी सांगितले.

तपासासाठी एसआयटीची मागणी

चरस व्रिकीचे प्रकरण राज्यातील 12 जिल्हे आणि देशातील 22 राज्याशी निगडित असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. त्यानुसार प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून तपासणी करण्याची मागणी लोेहमार्ग पोलीस अधीक्षकांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे.