भारतीय मानक ब्युरो संस्थेच्या अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

crime

पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी नमुने घेतल्याचा राग आल्यामुळे भारतीय मानक ब्युरो संस्थेच्या अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 51 वर्षीय व्यक्तीने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तक्रारदार हे भारतीय मानक ब्युरो संस्थेत नोकरीला आहेत. पाण्याच्या गुणवत्तेसाठी आयएओ ट्रेडमार्क देण्याचे काम पाहतात. 3 मार्चला सकाळी चारजण संस्थेच्या कार्यालयात गेले. त्यांनी तक्रारदार हे काम करत असताना सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

‘तुम्ही व तुमच्या अधिकाऱ्यांनी पुढील वर्षेभर आमच्या कोणत्याही फ्लॅटवर पाण्याचे नमुने घेण्यासाठी यायचे नाही, तुम्ही त्याठिकाणी आल्यास तुमचे हातपाय तोडू’, अशी धमकी दिली. तोंडावर काळी शाई टाकून त्याची व्हिडीओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून मार्केटयार्ड पोलीस तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या