
खून करून फरारी झालेल्या आरोपीला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. राकेश रमेश निंबोरे वय 25 रा. साखरवाडी, फलटण असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याला फलटण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
फलटण पोलीस ठाण्यातंर्गत दाखल एकाच्या खूनातील फरार आरोपी साखरवाडी फलटण बसस्थानकावर उभा असल्याची माहिती अमलदार श्याम सूर्यवंशी यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून राकेश निंबोरे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, एपीआय अभिजीत पाटील, शाम सूर्यवंशी, वैभव स्वामी, राकेश क्षीरसागर, ऋषीकेश दिघे, समीर माळवदकर, सचिन सरपाले यांनी केली.

























































