हातचलाखीने जेष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरले, सहा तोळ्याचे बिस्कीट देण्याचे दाखविले होते आमिष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बसची वाट पाहत थांबलेल्या ज्येष्ठ महिलेला गाठून त्यांना 6 तोळ्याचे सोन्याचे बिस्कीट देण्याच्या बतावणीने दोघा चोरट्यांनी 60 हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी 70 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी महिला हडपसर परिसरातील गाडीतळ याठिकाणी बसची वाट पाहत थांबली होती. त्यावेळी आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांना 6 तोळ्याचे मंगळसूत्र देण्याची बतावणी केली. त्यासाठी चोरट्यांनी महिलेकडील 60 हजारांचे मंगळसूत्र काढून घेतले. हातचलाखी करून चोरट्यांनी त्यांच्याकडील पिवळी सोन्याची बिस्कीटे देउन महिलेची फसवणूक केली. पोलीस अमलदार आर. व्ही. डेरे तपास करीत आहेत.