खेड शिवापूरमधील जुगार चालविणारी सराईत टोळी तडीपार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड शिवापूर भागात जुगार अड्डे चालविणार्‍या आठ सराइतांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेशही पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली असून अवैध धंदेवाल्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

राजेंद्र किसन कोंडे (50), राजेश राजन नायर (32), दिलीप उत्तम शिंदे (47), पापाभाई हुसेन शेख (59), संदीप मच्छिंद्र शिंदे, विशाल उत्तम कदम, पंकज संदीप कोंडे (32), खंडू अरुण खांबे (वय 26, सर्व रा. खेड शिवापूर, ता. हवेली) अशी तडीपार केलेल्यांची नाावे आहेत.

खेड शिवापूर भागात राजेंद्र कोंडे याची गुन्हेगारी टोळी असून संबंधित टोळीने परिसरात दहशत माजविली होती. कोंडे टोळीकडून जुगार अड्डे चालविण्यात येत होते. टोळीविरोधात तडीपार कारवाई करण्याचा प्रस्ताव राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, महेश बनकर, तोडकर यांनी तयार केला होता. प्रस्ताव उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील यांच्यावतीने पोलीस अधीक्षक गोयल यांना सादर करण्यात आला. त्यांनी प्रस्तावास मंजुरी देऊन कोंडे टोळीतील आठ जणांना पुणे शहर, जिल्हा, पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून एक वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले.