पेट्रोल चोरीची विचारणा केल्यामुळे भाच्यानेच केला मामावर कोयत्याने वार

लोकांच्या गाडीतील पेट्रोल का काढतो ? अशी विचारणा केल्याच्या रागातून भाच्यानेच मामावर कोयत्याने वार केल्याची घटना उत्तमनगर परिसरात घडली. याप्रकरणी भाचा सचिन राजु मारणे (२२, रा. उत्तमनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश श्रीहरी दुधाने (४०, रा. उत्तमनगर) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी सचिन मारणे हा गणेश श्रीहरी यांचा भाचा आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास त्यांनी सचिनला तु लोकांच्या गाड्यांमधील पेट्रोल का काढतो ? अशी विचारणा केली होती. त्याचा राग आल्यामुळे सचिनने श्रीहरी घरी जाताना अचानक पाठीमागे जाऊन त्यांच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार शिंदे करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या