तडीपार सराईत हत्यारासह जेरबंद, मुंढवा पोलिसांनी केली कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तडीपारीच्या कारवाईनंतरही शहरात वास्तव्य करणार्‍या सराईताला मुंढवा पोलिसांच्या पथकाने हत्यारासह अटक केली.

सागर शंकर घोडके (22, रा. केशवनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. घोडके याला शहर परिसरातून तडीपार करण्यात आले आहे. तरीदेखील तो पुण्यात वावरत असल्याची माहिती मुंढवा पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार मुंढवा चौकाकडून मगरपट्ट्याकडे जाणार्‍या मुख्य रस्त्याच्या पुलाखालुन घोडके याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कोयता आढळून आला. यानुसार घोडके याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.