
पुणे शहरातील समर्थ पोलिसांच्या कार्यपत्परतेमुळे दुचाकी चोराला अवघ्या बारात तासामध्ये अटक करण्यात आले आहे. निलेश बाळु नेटके (रा. न्यू नानापेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी तरूणाने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी झाल्याची तक्रार समर्थ पोलीस ठाण्यात बुधवारी नोंदविण्यात आली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक शोध घेत होते. त्यावेळी कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना एकजण निशांत टॉकीजसमोरुन संशयास्पदरित्या दुचाकी चालवत असल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर संबंधिताला ताब्यात घेतले असता, चौकशीत त्याने इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी केल्याची कबुली दिली.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनानुसार एपीआय संदिप जोरे, संतोष काळे, सुशील लोणकर, हेमंत पेरणे, सुमित खुट्टे, सुनिल हसबे, सुभाष पिंगळे, विठ्ठल चोरमले, निलेश साबळे, सुभाष मोरे, श्याम सुर्यवंशी यांनी केली.
























































