कोंढव्यात फरारी गुंडाकडून अमली पदार्थ जप्त

मोक्का कारवाईनंतर फरारी झालेल्या गुंडाला पोलिसांनी पकडले असून त्याच्याकडून दोन ग्रॅम मेफेड्रोन अमली पदार्थ, दुचाकी असा 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अफाक अन्सार खान (वय 24, रा. रविवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

फरासखाना पोलिसांनी खान याच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली होती. त्यानंतर तो पसार झाला होता. तो कोंढवा भागात येणार असल्याची माहिती पोलीस नाईक ज्योतीबा पवार यांना मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून खानला पकडले. त्याच्याकडून 2 ग्रॅम मेफे ड्रोन आणि दुचाकी असा 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खानकडून जप्त करण्यात आलेल्या मेफेड्रोनची किंमत 13 हजार 500 रुपये आहे.

ही कामगिरी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, रमेश गरूड, तुषार आल्हाट, संजीव कळंबे, निलेश वणवे, निलेश देसाई यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या