मेट्रोचा प्रकल्प होणार असल्याचे सांगत केली सव्वा कोटींची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवाजीनगर भागातील कामगार पुतळा परिसरात असलेल्या जागेवर मेट्रोचा प्रकल्प होणार असल्याचे खोटे सांगुन गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांनी व्यावसायिकासह नातेवाईकांना तब्बल 1 कोटी 21 लाखांची फसवणूक केली आहे.

याप्रकरणी ईश्वर चंदुलाल परमार (70) व सनत ईश्वर परमार (46) यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज गुल जगासिया (वय-43,रा.पुणे) यांनी तक्रार दिली आहे.

आरोपी ईश्वर परमार व सनत परमार यांनी कामगार पुतळा, भांबुर्डा, शिवाजीनगर परिरसातील स्वतःच्या जागेवर मेट्रोचा प्रकल्प होणार होता. मात्र, संबंधित जागेवर विकसनाचे अधिकार त्यांना नव्हते. तरीही दोघांनी फसवणुक करण्याच्या उद्देशाने संबंधित जागेवर प्रोजेक्ट होणार असल्याचे खोटे पंकज जगासिया यांना सांगितले. गुंतवणुक केल्यास जादा परतावा देण्याचे अमिष दाखवले. आरोपींनी संबंधित प्रोजेक्टमध्ये लोकांना गुंतवणुक करण्यास भाग पाडुन 1 कोटी 21 लाख 40 हजार रुपये चेकद्वारे व आरटीजीएस द्वारे मे.ईश्वर कन्स्ट्रशक्न प्रा.लि.चे कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यावर घेतले. मात्र, ऑक्टोबर 2016 पासून आतापर्यंत त्याठिकाणी कोणतेही बांधकाम करण्यात आले नाही. आरोपींनी रकमेचा अपहार करत फसवणुक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर तपास करत आहे.