ज्येष्ठ नागरिकाच्या घरातून 9 लाखांचे दागिने चोरीला, स्वारगेटमधील मीरा सोसायटीतील घटना

ज्येष्ठ नागरिकाच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी 9 लाखांवर सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना मार्च 2021 ते जुलै 2022 कालावधीत स्वारगेटमधील मीरा सोसायटीत घडली. याप्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाचे मीरा सोसायटीत घर आहे. ते कामानिमित्त बाहेरगावी असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून 9 लाख आठ हजारांचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी घरफोडी करणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले तपास करत आहेत.