सराफाला खंडणी मागितल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची चौकशी होणार

539
crime

शहरातील एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला पिस्तूलाच्या धाकाने 50 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची चौकशी होणार असल्याची माहिती सुत्रांनी आहे. संबंधित नेत्याने 2015 ते 2017 कालावधीत जिल्हा परिषदेत बांधकाम व आरोग्य समितीचे सभापतीपद भूषविले आहे. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने आशिष हरिचंद्र पवार, रुपेश ज्ञानोबा चौधरी आणि रमेश रामचंद्र पवार यांना जेरबंद केले आहे. याप्रकरणी सदाशिव पेठेत राहणाऱ्या 42 वर्षीय सराफ व्यावयासिकाने दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आशिष पवार पुर्वी सराफ व्यावसायिकाकडे बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. रमेश पवार हा सराफ व्यावसियाकाच्या घरात काम करत होता.तर चौधरी सामाजिक कार्यकर्ता आहे.

आरोपींनी सराफाला खंडणी मागण्याआधी तत्कालीन जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समिती सभापतीने त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी संबंधित नेत्याने सराफाला चौधरी चांगला ओखळीचा असून माझी सर्व कामे पाहत असल्याचे सांगितले. त्यानंतर आशिष, रुपेश आणि रमेशने संगनमत करुन सराफाच्या घरातील एका महिलेची व्हिडिओ क्लीप तयार केली. त्यानंतर ती व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन सराफाकडे चार मार्चला 50 कोटी रूपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी पोलिसांना माहिती दिल्यास गोळी घालून जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर सराफाने गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चनिंसग यांच्याकडे धाव घेऊन सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी खंडणी विरोधी पथकाने तिघांना जेरबंद केले. याप्रकरणी संबंधित जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची चौकशी करण्याचे सूतोवाच वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या