
जेवण केल्यानंतर शतपावली करीत असलेल्या लष्करी अधिकाऱ्याचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना खडकी भागात घडली असून कर्नल तेजिंद्र कुमार थापर (वय 58, रा. ऑर्डनन्स इस्टेट, खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
थापर हे लष्करात कर्नल पदावर कार्यरत असून जेवण करुन ते शतपावलीसाठी जात होते. त्यावेळी मुळा गेस्ट हाऊससमोर दुचाकीस्वार चोरट्यांनी थापर यांच्याकडील मोबाइल हिसकावून नेला. थापर यांनी चोरट्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहन साळवी तपास करत आहेत. शहरात गेल्या काही महिन्यांपासून पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.






























































