
पुण्यात इमारतीचे बांधकाम सुरू असताना 16 व्या मजल्यावरून पडल्याने कामगार ठार झाला. याप्रकरणी निष्काळजीपणा बाळगल्याने साईट इंजिनिअरसह मशीन चालकाविरूद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश बंधन पन्डो (वय 22, रा. वाकड ) असे ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अशोक कदम यांनी फिर्याद दिली आहे.
नर्हेत पारी टॉवरचे काम सुरू आहे. त्याठिकाणी राजेश बिगारी काम करीत होता. बांधकाम सुरू असताना कंपनीकडून कामगारांच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेतली नाही. त्यामुळे डक्ट उघडा असल्याने क्राँकीटचे काम सुरू असताना राजेश 16 व्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीररित्या जखमी झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पी. बी. कणसे तपास करीत आहेत.
























































