पुणे – दारू पिण्यास पैसे न दिल्यामुळे तरूणाला उलट्या कोयत्याने मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून दोघांनी तरुणाला उलट्या कोयत्याने बेदम मारहाण करत लुटल्याची घटना वारजेतील गोकूळनगर परिसरात घडली.

याप्रकरणी मंगेश विजय जळितकर (वय 22, रा. शिवणे), रोहीत राजुभाऊ भडके (वय 27, रा. कर्वेनगर), सौरभ प्रकाश मोकर (वय 20, रा. उत्तमनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अनिकेत राठोड (वय 20, रा,गोकुळनगर पठार वारजे) यांनी तक्रार दिली आहे. जळितकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापुर्वी मोक्काअंतर्गत कारवाई आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड हे त्यांचे मामा प्रभाकर यांना जेवणाचा डबा देण्यासाठी गोकुळनगर येथे गेले होते. गाडी पार्किंग करण्यासाठी थांबले असता आरोपींनी त्यांना दारु पिण्यासाठी पैशाची मागणी केली.

त्यावेळी त्यांनी पैसे देण्यास नकार दिला म्हणून तिघांनी कोयत्याने बेदम मारहाण करत खिशातील एक हजाराची रोकड काढून घेतली. मारहाण सुरू असल्याचे पाहून शेजारील नागरिक मदतीला धावले असता त्यांच्यावर कोयता उगारून गाडीवरून पळ काढला.