तुमच्या बायकोला बायको म्हणायला आम्ही लग्न कशाला केलं मग?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पुणे

भाजपच्या चिन्हावर आम्ही कसे लढायचे? तुमच्या बायकोला बायको म्हणायचे, तर आम्ही लग्न कशाला केले, असा सवाल राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते, राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.

भाजप माढा आणि बारामती या दोन जागा आमच्या पक्षाला देत होता, पण आमच्या उमेदवारांना चिन्हही भाजपचे देत होते. त्यामुळे आम्ही त्या जागा स्वीकारण्यास नकार दिला, असे त्यांनी सांगितले. भाजपचे चिन्ह घेऊन लढायचे तर आम्ही स्वतंत्र पक्ष का चालवतो आहोत, असा सवाल त्यांनी केला. ज्या पक्षाचे चिन्ह असते उमेदवार त्या पक्षाचा ठरतो. आमच्या पक्षाला भाजपच्या चिन्हावर लढायला लावणे याला युती नाही बेकी म्हणतात, असेही जानकर यांनी भाजपला सुनावले.