दारूसाठी कोयत्याच्या धाकाने तरूणाला लुटण्याचा प्रयत्न, आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोयत्याचा धाक दाखवून दारू पिण्यासाठी 2 हजार रूपयांची मागणी करीत तरूणाला लुटण्याच्या प्रयत्न करणार्‍या पोलिसांनी अट केली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास पुण्यातील कॅम्पमधील एमजी रस्त्यावर घडली. आकाश गोरख कांबळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सिद्धार्थ जोशी यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सवा चारच्या सुमारास सिद्धार्थ दुचाकी काढत होते. त्यावेळी आरोपी आकाश हातात कोयता घेउन आला. त्याने दारू पिण्यासाठी सिद्धार्थकडे 2 हजार रूपये मागितले. मात्र, त्यांनी नकार दिल्यामुळे आरोपीने सिद्धार्थसोबत झटापट केली. त्यामुळे ते दुचाकी सोडून दुसरीकडे गेले. त्यानंतर आरोपीने सिद्धार्थच्या दुचाकीवर दगड मारून नुकसान केले. त्याशिवाय एटीएम सेंटरच्या काचेवरही दगड मारला. याप्रकरणी आरोपी आकाशला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.