पुणे – पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेने एनडीए रस्त्यावर उत्तमनगर परिसरात पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल, काडतुस जप्त करण्यात आले. संतोष यशवंत शिंदे (वय 26,रा.ताडीवाला रस्ता)असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

सराइत आरोपी एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर भागात थांबला असून त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील हवालदार संतोष क्षीरसागर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याच्याकडून पिस्तुल आणि एक काडतुस जप्त करण्यात आले. ही कामगिरी पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, निंबाळकर, संतोष क्षीरसागर, नेवसे, क्षीरसागर, कट्टे यांनी केली.