
बघून हसल्यामुळे झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाला चौघांनी जबर मारहाण केल्याची घटना उंड्री परिसरात घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवानंद ईश्वर कामठे, संकेत विठ्ठल भिंताडे, पंकज कामठे, परमार माने अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोन दिवसांपूर्वी तक्रारदार यांची आरोपीचा मित्र तुषार साहू याच्यासोबत एकमेकांकडे बघून हसल्यामुळे भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरून आरोपींनी बुधवारी रात्री येऊन डोक्यात लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. यामध्ये तक्रारदार हे जखमी झाले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस तपास करत आहेत.






























































