पाणी देण्याच्या बहाण्याने गतिमंद तरुणीवर अत्याचार; एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाणी देण्याच्या बहाण्याने गतिमंद तरुणीला घरात बोलावून अत्याचार केल्याची घटना बी.टी. कवडे रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी संबंधिताला मुंढवा पोलिसांनी अटक केले.

शंकर अंकुश ताकमोगे (वय 58, रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पीडित तरुणीच्या आईने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी गतिमंद असून तिची आई घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावरील एका सोसायटीत रखवालदार आहेत. सोसायटीने त्यांना राहण्यास जागा दिली आहे. त्याचा गैरफायदा घेउन आरोपी ताकमोगे याने तरुणीला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी गतिमंद तरूणी गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.