पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या पुणे ते मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम राजेवाडी-जेजुरी-दौंड या स्थानकादरम्यान प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असल्याने कोल्हापूर-मिरज-पुणे व पुणे-लोणंद-फलटण मार्गावर धावणारी पॅसेंजर रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच, काही फेऱया अर्ध्या मार्गावर सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याचा फटका सर्वैसामान्य प्रवाशांना बसला आहे.

पुणे ते मिरज रेल्वे लोहमार्गाच्या विद्युतीकरण व दुहेरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे रेल्वेच्या काही पॅसेंजर फेऱया रद्द करून काही अर्ध्या मार्गावर सुरू ठेवण्यात आल्या आहेत. पुणे-मिरज-कोल्हापूर डेमू एक्प्रेस ही पुणे ते सातारा दरम्यान रद्द करण्यात आली आहे. सातारा – मिरज-कोल्हापूर या दरम्यान ती नियत वेळेनुसार धावणार आहे. तसेच, एक्प्रेस सेवांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

27 जुलैपर्यंत हे बदल करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेकडून 11 जुलैपर्यंत एका टप्प्यात, तर 12 ते 27 जुलै या दुसऱया टप्प्यात राजेवाडी – जेजुरी-दौंड या स्थानकादरम्यान रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम केले जाणार आहे. 27 जुलै या कालावधीत सातारा-पुणे-सातारा, पुणे-लोणंद-फलटण, फलटण-लोणंद, लोणंद-फलटण व फलटण-पुणे या मार्गावरील पॅसेंजर रद्द करण्यात आल्या आहेत.