पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक, गुन्हे शाखेची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील वडगाव-बुद्रूक परिसरात असलेल्या शहा पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाचजणांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून पिस्तूल, कोयता, गावठी कट्टा अशी शस्त्रे जप्त करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी दांगट मळा परिसरात करण्यात आली. अमेय सुधकर मारणे (वय 25, रा. दांडेकर पूल), मंदार श्रीधर दारवटकर (वय 24 रा. वडगाव बुद्रूक), जयेश लक्ष्मण भुरुक (वय 22, रा. वडगाव बुदू्रक), राहूल मच्छिंद्र कांबळे (वय 22, माणिकबाग सिंहगड रस्ता), ऋतिक संभाजी वाघमारे (वय 21, रा. गोसावी वस्ती, वडगाव बुद्रूक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार संजय बरकडे यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक वडगाव बुद्रूक परिसरात पेट्रोलिंंग करीत होते. त्यावेळी शहा पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी दांगट मळापरिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अमेय, मंदार, जयेश, राहूल, ऋतिकला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पिस्तूल, गावठी कट्टा मिळून आला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. घाडगे अधिक तपास करीत आहेत.