गुन्हेगारी संपविण्याच्या दृष्टीने आराखडा तयार – पोलीस आयुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाउनमुळे बेरोजगारी वाढल्यामुळे शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. प्रत्यक्षात मात्र, याचे निश्चीत प्रमाण सांगता येणार नाही. अनलॉकनंतर गुन्हेगारांनी हैदोस घातला असून खून, खूनाचा प्रयत्न, मारहाण, जबरी चोरी, घरफोडी अशा घटनांनी नागरिक भीतीखाली आहेत. त्यापार्श्वभूमीवर मागील 10 दिवसांत घडलेल्या सहा खूनाच्या गुन्हयांच्या तपासासंदर्भात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यावेळी सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त नामेदव चव्हाण उपस्थित होते.

पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावरच सोमवारी बांधकाम व्यवसायिकाची हत्या झाली होती. त्यामुळे शहरात कायदा-सुव्यस्था अबाधित राखण्याचे पोलिसांवरील दडपण वाढले होते. मात्र, हत्येप्रकरणी पोलिसांनी चोवीस तासात गुन्हेगारांना अटक करण्यात आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. लॉकडाऊनच्या काळात 260 गुन्हेगार जामिनावर सुटले आहेत. नेमके याच काळात गुन्हेगारी वाढल्याचे दिसून आली आहे. पण जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांमुळे गुन्हेगारी वाढली असे ठोसपणे सांगू शकत नाही. गुन्हे घडणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. घटना घडल्यानंतर तत्काळ कारवाई करत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. शहरातील गुन्हेगारी संपवण्याच्या दुष्टीने प्रयत्न करत आहोत. येत्या तीन महिन्यात शहरातील वेगळे चित्र दिसणार असल्याची ग्वाही गुप्ता यांनी पुणेकरांना दिली आहे. सहा खूनाच्या गुन्हयांपैकी पाच खूनाचे गुन्हे पोलिसांनी २४ तासात उघडकीस आणले आहेत. फरासखाना, चंदननगर, बंडगार्डन, कोंढवा, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खूनाचे गुन्हे तत्काळ उघडकीस आणण्यात आल्याबद्दल त्यांनी पोलिसांचे कौतुक केले.

गुन्हेगारांची यादी तयार, तीन महिन्यांत चित्र बदलेल
शहरातील गुन्हेगारी संपवण्यासाठी संपुर्ण पोलीस दल प्रयत्न करत आहोत. येत्या तीन महिन्यात तुम्हाला शहराचे पुर्णपणे वेगळे चित्र दिसणार आहे. गुन्हेगारांची यादी तयार केली जात असून त्यांच्यावर मोठी कारवाई होणार आहे. गुन्हेगारांना पुर्वीपेक्षाही जादा जरब बसल अशी ग्वाही आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नागरिकांना दिली आहे.

बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी चौघे अटकेत
बावधन येथील 10 एकर जागेच्या वादातून बांधकाम व्यावसायिक राजेश कानाबार (वय 63) यांच्या हत्येप्रकरणात बंडगार्डन पोलिसांनी चौघांना अटक केली. राहुल आनंदा कांबळे, रुपेश आनंदा कांबळे, गणेश ज्ञानेश्वर कुऱ्हे (रा. बावधन), हसमुख जसवंतभाई पटेल (रा. सुखसागनरनगर, बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.