
शेतकरी आंदोलनाची शक्यता लक्षात घेउन अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. त्याशिवाय आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व आंदोलनकर्त्यांशी योग्य समन्वय साधण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांकडून निवेदने स्वीकारणे, एकाच जागेवर निर्देशने करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेतली असल्याची माहिती पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.
आंदोलन करताना कोणीही सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप होईल असे वर्तन करणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, हडपसर, सातवाडी, मार्वेâटयार्ड, धायरी फाटा, जिल्हा परिषद, मंडई, लक्ष्मी रस्ता परिसरात आंदोलन करण्यात येणार आहे. त्याठिकाणी पोलिसांकडून योग्य तो समन्वय ठेवण्यात आला आहे. हिंदुस्थान बंद संविधानीक मार्गाने व्हावा, सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता आंदोलनकर्त्यांनी घेण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

























































