आर्थिक फसवणूकीच्या प्रकरणातील तपासासाठी चार पथकांची स्थापना

pune-police

फसवणूक व आर्थिक गुन्ह्याचा तपास वेगाने करण्यासह कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी चार पथकांची स्थापना करण्यात आली आहे. फसवणूकीच्या विविध तक्रारीच्या तपासासाठी गुन्ह्यांची वर्गवारी करून संबंधित पथकाकडे तपास सोपविण्यात येणार आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

गुप्ता म्हणाले, जमिनीच्या वादासंदर्भात प्राप्त तक्रारींचा तपास करण्याची जबाबदारी युनिट एकची स्थापना केली आहे. जमीन वाद, आर्थिक गुन्हे शाखेतील प्रशासकीय कामकाजासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. युनिट दोनकडे बँकींग संदर्भात फसवणूकीचा तपास करणार आहे. त्यामध्ये बँक, ठेवी, गुंतवणूक आणि शेअर मार्केटमधील गुंतवणूकीचा समावेश आहे. त्याशिवाय युनिट तीनमध्ये हौसिंग क्षेत्रातील फसवणूक, विकसनशील गृहप्रकल्प, मोफा अ‍ॅक्ट केसेस, नोकरी, स्टॅम्प व बनावट नोटा, शैक्षणिक व वैद्यकीय प्रवेश संदर्भातील फसवणूकीचा तपास करणार आहे. यासह वरील प्रकार वगळता इतर सर्वप्रकारच्या फसवणूकीचा तपास युनिट चार करणार आहे.

तीन कोटीपेक्षा कमी रकमेचा तपास पोलीस ठाण्यांकडे

तीन कोटीपेक्षा कमी रकमेची फसवणूकसंदर्भातील तपास पोलीस ठाण्यांकडून करण्यात येणार आहे. त्याशिवाय तीन कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणूकीचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत करण्यात येणार आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या