पुणे – स्वारगेट पोलिसांमुळे मिळाले नगरसेविकेच्या मुलाचे दागिने

हाताला जखम झाल्यानंतर रुग्णालयातून उपचार घेउन  रिक्षाने प्रवास करणाNया नगरसेविकेच्या मुलाचे रिक्षात विसरलेले तब्बल 1 लाख 80 हजाराचे दागिने मिळवून देण्यात स्वारगेट पोलिसांना यश आले आहे. त्यासाठी पोलिसांनी परिसरातील तब्बल 100 सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करुन  रिक्षाचालकाचा शोध घेत दागिने मिळवून दिले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, नगरसेविका कविता वैरागे यांचा मुलगा काल दुपारी बाराच्या सुमारास रिक्षातून प्रवास करीत होता. त्यावेळी साडेचार तोळे दागिने असलेली पिशवी तो रिक्षामध्ये विसरला होता.
त्याची किंमत जवळपास 1 लाख 80 हजार इतकी होती.

दागिने विसरलेली माहिती वैरागे यांनी स्वारगेट पोलिसांना दिली. त्यानुसार स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई ज्ञाना बडे आणि मनोज भोकरे यांनी परिसरातील तब्बल 100 सीसीटीव्हीचे फुटेज तपासून रिक्षाचालकाचा मार्ग काढला. त्यानंतर रिक्षात असलेली दागिन्यांची पिशवी नगरसेविका कविता वैरागे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. ही कामगिरी पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस कर्मचारी ज्ञाना बडे, मनोज भाकरे यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या