
नाना पेठेतील एका हॉलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकला. याप्रकरणी जुगार चालविणाऱ्यासह २६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने कारवाई केली आहे.
जुगार अड्डा चालविणाऱ्या सोमनाथ सयाजी गायकवाड (36, रा. नाना पेठ) आणि अशोक सिंग अंबिका सिंग (36, रा. गोपी चाळ, दापोडी) यांच्यासह पोलिसांनी 26 जणांविरूध्द समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अड्डयावरून 2 लाख 18 हजार 680 रूपयाचा ऐवज जप्त करून 14 मोबाईल जप्त केले आहेत.
महेशकुमार जाधव वय 34 रा.दापोडी, ओंकार उमेश बनसोडे वय 20 रा. आंबेगाव पठार, सुरज अशोक कासट वय 34 रा. शुक्रवार पेठ, सुनिल मारूती दळवी वय 45 रा. सोमाटणे फाटा, अशोक लस्मण ओव्हाळ वय 64, बाबासाहेब भाऊसाहेब साठे वय 35, उमेश नंदु किरवे वय 23 आंबेगाव पठार, अक्षय गोरख भापकर वय 26, इस्माईल मैनुददीन उस्ताद वय 32, प्रभाकर बळिराम पवार वय 60, राजीक मेहबुब शेख वय 22, कुंदनकुमार प्रद्रिप साव, राजेश कुमारेसन वय 45 सुर्यकांत कुमार सिंह वय 36, महाविर मंडल वय 38, महेंद्र प्रसाद वय 49, प्रविण प्रसाद घोटाळे वय 42 कृष्णा तुकाराम पिनाटे वय 50, अविनाश रामदास महामुनी वय 30, गजानन दिलीप आसलकर वय 22, प्रफुल्ल दिलीप रणसिंग वय 22 मनिष संगप्पा निंबरगे वय 28, अनिल अनंत चुरी वय 59 अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.


































































