Pune crime news – रेकॉर्डवरील सराईताकडून पिस्तुल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराकडून समर्थ पोलिसांच्या पथकाने एक पिस्तूल, जिवंत काडतुस जप्त केले. सोमवार पेठ परिसरात ही कारवाई करण्यात आली. सिध्दीक रफिक खान (वय 24, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

समर्थ पोलिसांचे पथक हद्दीत हस्तीवर होते. यादरम्यान सिद्दीक खान याचेकडे पिस्तूल असुन तो रात्री सोमवार पेठ पोलीस चौकी शेजारील समर्थ व्यायाम मंदिरासमोर येथे त्याच्या मित्रास भेटण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून खान याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत कमरेस पॅन्टच्या आतमध्ये एक पिस्तूल, एक काडतुस मिळुन आले. त्याचेकडून पोलिसांनी एकुण 10 हजार 200 रुपये किंमतीचे पिस्तूल व काडतुस जप्त केले.

पश्चिम प्रादेशीक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल, समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर, गुन्हे निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल रणदिवे, सौरभ थोरवे, अंमलदार प्रमोद जगताप, गणेश वायकर, संतोष डमाले, रोहीदास वाघेरे, रहीम शेख, हेमंत पेरणे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.