पुणे- खासगी बस आणि ट्रेलरचा अपघात, 1 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात ठिकठिकाणी अपघातांची मालिकाच सुरू झाल्याचं चित्र आहे. पुण्यातील वाकड पुलाजवळ पहाटे चार वाजता एक खासगी बस आणि ट्रेलरचा अपघात झाला आहे.

या अपघातात 10 जण जखमी झाले. जखमींपैकी 2 जणांची प्रकृती गंभीर होती, त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.