टेम्पोने मोटारीला केले ओव्हरटेक अन झाला राडा, लाथा-बुक्क्या, लोखंडी रॉडने तुंबळ हाणामारी

प्रातिनिधिक फोटो

भरधाव वेगातील टेम्पोचालकाने मोटारीला ओव्हरटेक केले. त्याचा राग आल्यामुळे झालेल्या बाचाबाचीतून टेम्पोचालक आणि मोटारचालकामध्ये तुंबळ हाणामारी झाली. राग सहन न झाल्याने टेम्पो चालकाने मोटारचालकाला रॉडने मारहाण केली. ही घटना दोन दिवसांपूर्वी रात्री सातच्या सुमारास फुरसुंगीतील मंतरवाडीपूलावर घडली.

याप्रकरणी टेम्पोचालक अनुप हरिश्चंद्र राउत (वय -42, रा. काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दीपक शिवाजी अवताडे (वय -28, रा. हांडेवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी दीपक आणि त्यांचा भाऊ तुषार मोटारीतून मंतरवाडी पूलावरून चालले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टेम्पोचालक अनुपने दीपकच्या मोटारीला ओव्हरटेक केले. त्याचा राग आल्यामुळे दीपकने पाठलाग करून अनुपला अडवून जाब विचारला. त्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचा राग आल्यामुळे अनुपने दीपकच्या कानावर रॉडने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी पोलीस हवालदार देवधर तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या