पुणे – पोलीस मुख्यालयात फ्रीस्टाईल हाणामारीमुळे दोन पोलीस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pune-police

सायबर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना फ्रीस्टाईल हाणामारी भोवली आहे. प्रशासनाने दोघांची तत्काळ उचलबांगडी केली असून त्यांना पोेलीस मुख्यालयात संलग्न करण्यात आले आहे. मंगेश माणिक नांगरे आणि राजकुमार लक्ष्मण जाबा अशी उचलबांगडी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

फाईल देणे-घेण्याच्या वादातून एकाने सहकाऱ्यास बेदम मारहाण केली होती. त्यामुळे पोलीस मुख्यालयात कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा रंगली होती. सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला संबंधित पोलीस हवालदार मंगेश नांगरेने फाईल देणे-घेण्याच्या वादातून राजकुमार जाबा याला  बेदम मारहाण केली होती. त्यामुळे सायबर पोलीस ठाण्यात खळबळ उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये नांगरे आणि जाबा दोघेही दोषी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांना सायबर पोलिस ठाण्यातून तत्काळ कार्यमुक्त करुन पोलिस मुख्यालयात संलग्न करण्यात आले. सायबर पोलिस ठाण्यात एकमेकांना समजून घेत काम करणे अपेक्षित दोघांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाली. त्यामुळे संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात आली.