
मोबाइल चोरट्याला अटक करण्यात उत्तमनगर पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून मोबाइल जप्त करण्यात आला आहे.
मोबाईल चोरटा कोपरे बसस्थानकाजवळ असल्याची माहिती पोलीस शिपाई शशांक खाडे यांना मिळाली. त्यानुसार उत्तमनगर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मोबाइल चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर, पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे, एपीआय उमेश रोकडे, नांगरे , हजारे, वारुळे, समीर पवार, गायकवाड, शशांक खाडे यांनी केली.

































































