
धक्का लागल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एका केटरिंग व्यावसायिक तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना काल रात्री येरवडा परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
प्रतीक हनुमंत वण्णाळे (वय 25 रा. पंचशीलनगर येरवडा) असे खून झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीकचा केटरिंगचा व्यावसाय आहे. काल रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास येरवड्यात कॉमर्स झोन परिसरातील मोकळ्या जागेत तिघे जण बसले होते. त्यावेळी प्रतीक त्याठिकाणी गेला. तिथे धक्का लागल्याच्या कारणावरून रागातून तिघांनी प्रतीकवर कुऱ्हाडीनेवार करून खून केला.


























































