पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी रात्री त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात नेण्यात आलेले. तेथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना पोटाचा संसर्ग (stomach infection) झाल्याचे समजते. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.