पूर्णा – किरकोळ कारणातून घरात घुसून मारहाण, 6 जण पोलिसांच्या ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किरकोळ कारणातून घरात घुसून काठीने व विटकरीने मारहाण करीत घरातील सामानाची नासधूस करणाऱ्या सहा जणांना पूर्णा पोलिसांनी ताब्यात घेतले. पूर्णा फुलेनगरातील ही घटना आहे.

पूर्णा फुलेनगरातील रहिवाशी शेख इस्माईल शेख महेबुब यांच्या घराजवळ बुधवारी सकाळी एक कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात नाचणाऱ्यांना महेबुब यांनी येथे नाचू नका असे म्हटल्याने वाद झाला. याच वादातून त्यांना शिविगाळ आणि मारहाण करण्यात आली. या प्रकरणी त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली.

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींना आपल्याला लाठ्या-काठ्या आणि विटकरीने मारहाण केल्याचे फिर्यादी महेबुब यांनी म्हटले. तसेच घरात प्रवेश करत सामानाची नासधुस केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली असेही त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत 6 जणांना ताब्यात घेतले आहे. तर काही आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक नांदेड येथे गेले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.