सुवासिनींच्या वाणातून आंबा, करवंद, जांभळे होणार गायब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवडय़ात साजरा होणारा ‘वटपौर्णिमा’ हा सण यंदा अधिक मासामुळे चक्क २७ जून रोजी होत आहे. यामुळे सुहासिनींच्या वाणात आंबा, करवंद, जांभळे दिसणार नाहीत. या फळाऐवजी कोणती फळे वाणात ठेवावीत या चिंतेत आतापासून सुहासिनी आहेत.

यावर्षी १६ मे पासून अधिक मास सुरू झाला. यामुळे आपसूकच मराठी सण १५ ते २० दिवस पुढे सरकले आहेत. मराठी संस्कृतीप्रमाणे या दिवशी सुवासिनी वटवृक्षाची पूजा करून फळांचे वाण ठेवतात. या वाणात आंबा, करवंद, जांभळे याबरोबरच फणसाचे गरे, केळी अशी फळे ठेवली जातात. यंदा मात्र २७ जूनला वटपौर्णिमा साजरी केली जात असल्याने आंबा, करवंद, जांभूळ या फळांचा सीझन संपत आला आहे. यामुळे यंदा वटपौर्णिमेला वाणामध्ये सुवासिनींना इतर फळांना पसंती द्यावी लागणार आहे.

पावसाचा फटका
चार दिवस सलग पाऊस पडल्याचा फटका कोकणच्या मेव्याला बसला आहे. विशेषत: मुंबईत कोकणातून येणाऱया फळांची आवक घटली आहे. आंबा, करवंद, जांभळे बाजारातून गायब झाली असून वटपौर्णिमेसाठी फणसही उशिराने दाखल होणार आहेत.