विचारा तर खरं…

>> उदय पिंगळे, अर्थ अभ्यासक

वाचकहो, आर्थिक गुंतवणुकीसह आर्थिक समस्यांसंदर्भातील तुमच्या मनातील प्रश्न, शंका [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवा.

इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट याबद्दल काही सांगू शकाल का? – वैभव गोलीम, सीबीडी, नवी मुंबई

उत्तर – इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट याला संगणकीय सुवर्ण पावती म्हणू यात. सोने खरेदी किंवा विक्रीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी प्रचलित यंत्रणेतून पारदर्शक पद्धतीने सोन्याच्या बाजारभावाचा शोध घेता येण्यावर मर्यादा आहेत. यासाङ्गी मागील अर्थसंकल्पात आपल्या अर्थमंत्र्यांनी कोङ्गार विकास आणि नियामन प्राधिकरण व स्वतंत्र सुवर्ण बाजाराची स्थापना याबद्दलची घोषणा करून त्याचे नियमन सेबीकडे असेल असे सांगितले होते. यासाङ्गी सोन्याचे प्रतिनिधित्व करणाऱया संगणकीय सुवर्ण पावत्या तयार केल्या आहेत. त्यांची निर्मिती, स्वीकार आणि वितरण करणारा नियमित सुवर्ण बाजार भविष्यात निर्माण होऊ शकेल. सध्या याची खरेदी-विक्री करण्यासाङ्गी मुंबई शेअर बाजारात स्वतंत्र व्यवस्था आहे.