
शिक्षक निरीक्षक पश्चिम विभागांतर्गत आर पूर्व विभागाचे विज्ञान प्रदर्शन बोरिवली पूर्व येथील सेंट जॉन्स हायस्कूलमध्ये 17 ते 19 जानेवारीदरम्यान होणार आहे. सदर विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय तंत्रज्ञान व खेळणी हा असून एकूण 7 उपविषयांवर विविध प्रकल्प सादर केले जातील. एकूण 90 पेक्षा जास्त शाळांचे विद्यार्थी या विज्ञान प्रदर्शनात आपल्या संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण करणार आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी शास्त्रज्ञ डॉ. कुमार हेमंत सिंह हे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सहशालेय उपक्रमांच्या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी जवाहर बालभवन मुंबईचे संचालक राजू नाईकवडी उपस्थित राहणार आहेत. सदर प्रदर्शनाला विभागातील नागरिकांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजक शिक्षण उपनिरीक्षक अश्विनी लाठकर, मुख्य निमंत्रक संजय पाटील व सेंट जॉन्स हायस्कूलच्या विश्वस्त शिवा नम्बियार यांनी केले आहे.





























































