Euro Cup final – पेनल्टी फसलेल्या तीन खेळाडूंवरील वर्णद्वेषी टीकेने गालबोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इटलीने पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडला 3-2 अशा फरकाने धूळ चारली. या पराभवामुळे 55 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची ट्रॉफी जिंकण्याच्या यजमान इंग्लंडच्या आशांना सुरूंग लागला. या पराभवामुळे गोऱयांचे डोके चांगलेच फिरले. खिलाडूवृत्तीला बगल देत इंग्लंडच्या चाहत्यांनी पेनल्टी फसलेल्या मार्कस रॅशपर्ह्ड, जेडन सँचो व बुकायो साका या तीन खेळाडूंवर वर्णद्वेषी शेरेबाजी केली. या प्रकरणामुळे इंग्लंडमधील फुटबॉलला गालबोट लागले. इंग्लंड फुटबॉल असोसिएशनने यावर नाराजी व्यक्त केली असून या प्रकरणात दोषी सापडलेल्यांवर कारवाई करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहेत.

लाज वाटायला हवी

ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनीही खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका केल्याचा निषेध केला आहे. यावेळी खडे बोल सुनावताना म्हटले की, युरो स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणाऱया इंग्लंडच्या या संघाला हीरो संबोधायला हवे. वर्णद्वेषी टीका करणे चुकीचे आहे. ज्या लोकांनी हे केले आहे त्यांना लाज वाटायला हवी.