
स्पेनचा दिग्गज टेनिसपटू रफाएल नदाल निवृत्तीनंतर दोन वर्षांनी अमेरिकेत कोर्टवर परतणार आहे. 22 ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा मानकरी असलेला नदाल फेब्रुवारीमध्ये लास वेगास येथे होणाऱ्या एका प्रदर्शनी टेनिस स्पर्धेत भाग घेईल, अशी घोषणा आयोजकांनी सोमवारी केली. 27 फेब्रुवारीला टी-मोबाईल एरिना येथे होणाऱ्या ‘द एमजीएम स्लॅम प्रेझेंटेड बाय पॅपिटल वन’ या स्पर्धेचे नदाल मुख्य आकर्षण असेल. ही स्पर्धा पॅलिपहर्नियातील इंडियन वेल्स येथे होणाऱ्या एटीपी 1000 स्पर्धेच्या अगदी आधी आयोजित केली जाईल.




























































