
जयपूर रग्ज ने तिचा ‘दि रग उत्सव’ वार्षिक सेल या महिन्याच्या सुरुवातीला घोषित केला, ज्याचा हेतू घरासाठी अप्रतिम रगने उत्सवाचा उत्साह वाढविणे हा आहे. प्रत्येक घरासाठी रग उत्सवासह विणकरांची कला साजरी करा.
आगामी सेल दरम्यान, ब्रँडने देशभरात रगची वाढती मागणी बघितली आहे. मुंबई आणि बंगळुरू शहरात अनुक्रमे एकूण विक्रीचा 22% आणि 10% असा सर्वात मोठा सहभाग आहे. रग उत्सवामुळे मागील वर्षीच्या 10% च्या तुलनेत 25% असा टायर 2 शहरांमध्ये मागणी वाढण्यात मदत झाली आहे. प्रीमियम हस्त-निर्मीत रग वर्गवारीत, बऱ्याच ग्राहकांना पारंपारिक आणि आधुनिक डिझाईन आवडले होते आणि त्यांनी आतापर्यंत एकूण विक्रीमध्ये 58% सहभाग घेतला आहे. एकूणच, नवीन वापरकर्त्यांसोबतच्या व्यवहारांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 40% वाढ झाल्यामुळे ब्रँडने त्याचा ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणात वाढवला.
जयपूर रग्जने उत्सव खरेदीचा अनुभव सुधारण्यासाठी तिच्या ग्राहकांना त्यांच्या निराळ्या गरजांनूसार शतको हस्तनिर्मीत कारपेट त्यांच्या वेबसाईटवर ठेवल्या आहे. ज्यांची खरेदी ग्राहक आरामात त्यांच्या घरी बसून करू शकतात. ते तज्ज्ञांचे सहाय्य सुद्धा देत आहेत जे ग्राहकांना योग्य निवड करण्यात मार्गदर्शन करू शकतात. तज्ज्ञांनी तयार केलेल्या निराळ्या आणि नवकल्पक डिझाईनसह, जयपूर रग्ज वेबसाईट आणि स्टोअर्सवर विक्री ऑफर्सच्या माध्यमातून खरेदीचा अमर्याद अनुभव देण्यासाठी सेल तयार करण्यात आला असून त्यामध्ये 20% ते 60% सूट आहे, ग्राहक उत्सवाची ऊर्जा वाढविण्यासाठी त्यांच्या घरूनच डिझाईनचा प्रकार निवडू शकतात.
उत्सव काळ चालूच रहाणार असल्याने, सोमप्लेस इन टाईम, जयपूर वंडरकेमर कलेक्शन, आकार कलेक्शन यांसारख्या अप्रतिम कलेक्शनसह तुमचे घर सजविण्याची ही वेळ आहे ज्यावर पहिल्यांदाच सूट देण्यात आली आहे. मुलांच्या प्लेरूम, नर्सरी किंवा बेडरूम ज्यांना सजवायच्या आहेत, कॉन्फेटी कलेक्शन केवळ मुलांच्या पायाखालीच आरामदायी नाही तर त्यांना खेळायला आणि शिकायलाही मदत करतात.
रग उत्सव जयपूर रग्जच्या वेबसाईटवर अजून लाईव्ह आहे आणि नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत जयपूर, दिल्ली, मुंबई आणि बंगळूर येथील स्टोअरमध्ये चालू आहे.

























































