पर्याय नसताना मैदान सोडणे योग्य नाही, शरद पवार यांचा राहुल गांधींना सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना पवार यांनी पर्याय नसताना मैदान सोडणे योग्य नाही. आपण असे अनेक पराभव पाहिलेले आहेत. यातून सावरण्यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे. तो नक्कीच करता येईल, असे राहुल यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात जे झाले त्याची तपशीलवार माहिती घेतली. याशिवाय महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार असल्यामुळे त्यासंदर्भात चर्चा झाल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची आपणास ऑफर आहे का, असे विचारले असता काँग्रेसमध्ये नेतृत्त्वाची कमतरता भासत असावी, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.