सिस्टम फेल आहे, आता ‘जन की बात करा’, काँग्रेस नेते राहुल गांधींचे टीकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून संवाद साधत कोरोनाचे संकट रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार उपाययोजना करत असल्याचे स्पष्ट केले. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सिस्टम फेल आहे, आता जन की बात करा, अशी टीका करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत. आता जन की बात करा, असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या मन की बात या कार्यक्रमावर टीकास्त्र सोडल. त्याचवेळी, या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची गरज आहे. काँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱयानो सर्व राजकीय कामं सोडा आणि जनतेला मदत करा. कोणत्याही परिस्थितीत देशातील जनतेची दुःख दूर करा. काँग्रेसचा हाच धर्म आहे, असे ट्विट करत राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना कोरोना विरुद्धच्या लढाईत झोकून देत काम करण्याचे आवाहन केले आहे.