नोकऱयाच नसतील तर आरक्षणाचा काय उपयोग? राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात नोकऱयाच उपलब्ध होणार नसतील तर नोकरीमध्ये आरक्षण देऊन काय उपयोग, असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला केला आहे. सरकारने सार्वजनिक मालमत्तांचे रोखीकरण (मॉनिटायझेशन) सुरू केले आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत नवीन नोकऱया उपलब्ध होतील असे दिसत नाही. त्यामुळे नोकरीतील आरक्षण कुचकामी असल्याचे ट्विट त्यांनी ‘इंडिया ऑन सेल’ हॅशटॅग वापरत केले.

देशातील सरकारी मालकीच्या सहा लाख कोटी रुपयां च्या प्रकल्पांचे मॉनिटायझेशन करण्याची घोषणा पेंद्र सरकारने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच शेतकऱयांच्या जमिनीचे वाळवंट करून त्या आपल्या उद्योजक मित्रांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.