
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, शेतकरी त्याचा शेतमाल देशात कुठेही जाऊन किकू शकतो. शेतकरी विमानाने त्याचा शेतमाल विकण्यासाठी जाईल की रस्त्याकर विकेल? रस्त्यावर शेतमाल विकायचा तर बिहारमध्ये रस्ते आहेत कुठे, असे प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी कृषी कायद्यावरून मोदी यांना लक्ष्य केले आहे. कृषी कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांमुळे शेतकऱयांचा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे; पण शेतकऱ्यांना याचा काहीच फायदा होणार नाही. उलट तोटाच होणार आहे. मोदी सरकार शेतकऱयांची फसवणूक करत असल्याची टीका त्यांनी केली.
मोदी खोटे बोलतात. आधी 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. आता इथे येऊन त्यांनी 2 कोटी रोजगार देण्याबद्दल भाष्य केले तर लोक त्यांना हाकलून लावतील. आम्हाला रोजगार देण्याची माहिती आहे. विकास करणे आम्हाला माहिती आहे. आमच्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे, आम्हाला मोदींसारखे खोटे बोलता येत नाही, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.



























































